आ. अंबादास दानवेसह 12 जणांवर गुन्हा दाखल
कंगना राणावत यांच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेने क्रांतीचौक उड्डाणपुला खाली विनापरवानगी निदर्शने केल्या प्रकरणी शिवसेनेच्या नेत्यांसह 12 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आमदार अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात,विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, माजी महापौर नंदकुमार घोडले,गिरीजाराम हळनोर,सचिन खैरे,मकरंद कुलकर्णी, प्रवीण जाधव,पप्पू कुलकर्णी,सह महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणावरून उफाळलेल्या वादानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिने शिवसेने विरोधात वक्तव्य केले होते.तिच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून शुक्रवारी क्रांतिचौक उड्डाणपुला खाली निदर्शने करीत शिवसेनेच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली होती, विनापरवानगी आंदोलन केले म्हणून शिवसेनेच्या आमदार, माजी महापौर, नगरसेवक सह 12 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.